भारताने केली ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी
बर्मिंगहॅम, दि. 09 - चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारताने एकदिवसीय सामन्यात 95 वेळा त्रिशतकी धावसंख्या उभारली. अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ होता. त्यांच्या विक्रमाशी भारताने बरोबरी साधली आहे. या यादीत आफ्रिका (77) तिसर्या, पाकिस्तान (68) चौथ्या तर श्रीलंका (62) पाचव्या स्थानी आहे.
याशिवाय, भारताने आजच्या सामन्यात मिळून सलग 5 सामन्यात त्रिशतकी धावसंख्या उभारली आहे.
याशिवाय, भारताने आजच्या सामन्यात मिळून सलग 5 सामन्यात त्रिशतकी धावसंख्या उभारली आहे.