Breaking News

11 वी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा आजचा शेवटचा दिवस

मुंबई, दि. 29 - मुंबईतील 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 27 जूनला प्रवेश अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस  होता. मात्र, शिक्षण विभागाकडून दोन दिवस वाढून 29 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.  अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्जात मुंबईत तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेवेळी त्रास झाला होता.
दरम्यान, मुदत वाढवण्यात आली असली तरी पुढील वेळापत्रकात शिक्षण विभागाकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे  कला आणि क्रीडा कोट्यातील गुण अपलोड झाले नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ उडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.