Breaking News

म.प्र.मधील रुग्णालयात प्राणवायू पुरवठा खंडित झाल्याने 11 जणांचा मृत्यू

इंदूर, दि. 23 - मध्य प्रदेशामधील महाराजा यशवंतराव रुग्णालयात प्राणवायूचा पुरवठा खंडित झाल्याने 11 रुग्णांचा मृत्यू झाला . यामध्ये दोन लहान मुलांचा  समावेश आहे. मध्यरात्री 3 ते 4 दरम्यान प्राणवायूचा पुरवठा 15 मिनिटांसाठी खंडित झाल्याने या रुग्णांचा मृत्यू झाला . प्राणवायू पुरवठा होण्याचे कारण  अद्यापकळाले नसून त्याची चौकशी सुरु आहे.
विभागीय आयुक्त संजय दुबे यांनी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच असेल तर या प्रकरणाची चौकशी करण्यात  येईल, असे दुबे यांनी सांगितले.