Breaking News

कुलभूषण जाधव यांच्या दयेचा अर्जाचे वृत्त परराष्ट्र मंत्री स्वराज यांनी फेटाळले

नवी दिल्ली, दि. 23 - कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याकडे दयेचा अर्ज केल्याचे वृत्त परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी  फेटाळून लावले.काल (22 जून) पाकिस्तानने एका चित्रफीतीच्या माध्यमातून कुलभूषण जाधव यांनी आपला गुन्हा मान्य करुन त्यांनी लष्कर प्रमुखांकडे दयेची  याचिका केल्याचे सांगण्यात येत आहे.
कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेला आव्हान देणार्‍या याचिकेची आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरु असून पाकिस्तानने अशा प्रकारच्या खोट्या चित्रफिती आणि पुरावे  सादर करुन न्यायालयाची दिशाभूल करु नये, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले. कोणतेही तथ्य आणि पुराव्यांअभावी पाकिस्तान कुलभूषण जाभव यांच्याविरुद्ध  खटला चालवत आहे. हेरगिरी केल्याचा खोटा आरोपही करत असल्याचे परराषट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गोपाळ बागले यांनी सांगितले.