Breaking News

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या 11 वाहनांवर कारवाई


औरंगाबाद,दि. 11  : पैठण तालुक्यातील वाघाडी वाळू पट्यात पैठणचे तहसीलदार महेश सावंत, मंडलधिकारी वाघमारे, तलाठी सोनवणे यांनी थेट गोदा पात्रात उतरून अवैध वाळू वाहतूक करण्यार्‍या जवळपास 11 वाहनावर कारवाई केली . कारवाई दरम्यान 11 पैकी बरेच वाहन चालक मालक आपल्या वाहनासह पळून जाण्यात 
यशस्वी झाले. परंतु त्यांची पंचनाम्यात घेण्यात आल्याची माहीती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली. तहसीदार महेश सावंत यांच्या अवैध वाळू चोरी करणार्‍या विरुद्ध

केलेल्या या धडाकेबाज कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.