Breaking News

भर पावसात धाड टाकून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त


नांदेड,दि. 11  : मध्यरात्री भर पावसात सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीत धाड टाकुन 13 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून, यात 7 लाख रुपयाचा गुटखा तर एका  बोलेरो जिपचा समावेश आहे. पाऊस, अंधार आणि चिखलात फायदा घेऊन गुटखा माफिया पसार झाले आहेत. पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात पोलिसांनी धडक्यात कारवाई सुरू केली आहे. माहुर ते सिंदखेड रोड रोडवर असलेल्या रामय्या बार जवळपास अवैध रित्या गुटखा विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकास मिळाली होती. त्यावरून सिंदखेड माहुर परिसरात जोरदार पावसात पथकाने सापळा रचला होता. रात्री 10.30 वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत पावसाच्या सरी सुरु असताना एक वाहन भरधाव वेगाने जात असताना पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर यान दिसले. यावेळी त्याच्या कर्मचार्यानी सदर वाहन अडवुन तपासणी केली असता, गाडीतील इसम अंधारात फायदा घेऊन गायब झाला. यावेळी पथकास बोलेरो जिप क्रमांक एम एच 13 -0153 मध्ये सागर व इतर कंपनीच्या गुटखा असलेले पोते मिळून आले. ज्याची अंदाजे किंमत 7 लाखाच्या जवळपास आहे, तर वाहन अंदाजीत 7 लाख असा एकुण 14 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीत जप्त करण्यात आला आहे. गेल्या अनेक म्हण्यापासुन या भागातील पोलीस अधिकारी व अन्न औषध प्रशासन आर्थिक व हप्ते खोरीत धन्यता मानत आहेत. न्यायालयाचे आदेशान्वये या प्रकारचे गुन्हे या विभागाने दाखल करावे असे निर्देश असल्याने अन्न औषध प्रशासन खाते पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कार्यवाहिनंतर आता आयत्या पिठावर रांग़ोळी काढुन गुन्हे दाखल करण्यासाठी येतील याची वाट येथील पोलीस प्रशासन पाहत आहे. दरम्यान 12 व्या दिवशी माहुर किनवट तालुक्यातील पथकाची मध्यरात्रीची 4 थी मोठी कारवाई असुन, दारूबंदी व अन्न व औषध प्रशासनासह स्थानिक पोलीसांना पोलीस अधिक्षकांच्या पथकाच्या धडाकेबाज कारवायामुळे धसका घेतला आहे. असे असली तरी मात्र हे अधिकारी गप्प का? आहेत हे समजायला मार्गच उरला नसल्याची
चर्चा या भागातील नागरीकातून चर्चिली जात आहे.