Breaking News

अन्यथा मुंबई ’एपीएमसी’त एक दिवसचा लाक्षणिक बंद : नरेंद्र पाटील



नवी मुंबई,दि.11 : येत्या दोन दिवसांत शासनाने शेतकर्‍यांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा न काढल्यास मुंबई एपीएमसीत एक दिवसचा लाक्षणिक बंद करण्याचा इशारा आमदार तथा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. वाशी येथील माथाडी भवन मध्ये व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी व माथाडी कामगार यांच्या बैठकीत ते बोलत होते.
 राज्यात शेतकर्‍यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगार व व्यापारी यांनी 12 जून रोजी सकाळी 11 वाजता दुचाकी फेरी काढण्याचा निर्णय आज एका बैठकीत घेतला आहे. माथाडी कामगार, वारणार, मापाडी, व्यापारी हे या फेरीत सहभागी होणार आहेत. माथाडी भवन ते
कोकण भवन (सीबीडी) पर्यंत ही फेरी काढून कोकण आयुक्तांना शेतकर्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे. राज्यातील शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतकर्‍यांना कर्जमुक्ती द्यावी, शेती व्यवसायाची डबघाईची स्थिती ओळखून शेती व ग्रामविकासासाठी भरीव तरतुद करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात,शेतीशी निगडीत ग्रामीण रोजगार संधीची निर्मिती करावी आदी शेतकर्‍यांच्या मागण्यांचे एक निवेदन कोकण आयुक्तांना देण्यात येणार आहे. या दुचाकी फेरीसाठी बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार नसून ज्या घटकांना शक्य आहे ते सर्व यात सहभागी होू शकतात, तसेच ही फेरी मुख्यमंत्र्यांना विरोध करण्यासाठी नसल्याचे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी कांदा-बटाटा, भाजीपाला, फळ, मसाला व धान्य बाजारातील व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व माथाडी कामगार उपस्थित होते. या बैठकीत नरेंद्र पाटील म्हणाले की, अगोदरच्या सरकारने शेतकर्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून मॉडेल अ‍ॅक्ट, थेट पणन, नंतरच्या सरकारने
नियमन मुक्ती आदी कायदे आणले आहेत. सरकारने हे करत असतांना माथाडी कामगारांच्या रोजी-रोटीचा विचार केला नाही. इतकेच नव्हे,तर शेतकरी नेत्यांनीही वेळो वेळी व्यापारी व माथाडी हे शेतकर्यांना लुबाडणूक करणारे असे आरोप केले आहेत. एवढे सर्व होऊनही आम्ही शेतकर्‍यांच्या पाठिशी आहोत. 1 जून पासून राज्यात शेतकर्यांनी संप सुरू केला असतांना आमचा या संपाला पाङ्गिंबा होता; मात्र मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीतील पाचही बाजारपेठामध्ये राज्यातील काही ठिकाणाहून तसेच परराज्यांतूनही शेतमाल दररोज येत होता. तो शेतमाल व्यापार्‍यांनी विकला नसता, तर आणखी शेतकर्‍यांच्या मालाची नासाडी झाली असती व शेतकर्‍यांच्या मालाचे आणखी नुकसान झाले असते.