नाशिकच्या प्रज्ञा पाटील यांचा सलग 102 तास योगाचा विक्रम
नाशिक, दि. 21 - नाशिकच्या प्रज्ञा पाटील यांनी सलग 102 तथॉन योग करत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान पटकावून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या एक दिवस आधीच त्यांनी हा विक्रम नोंदविल्याने नाशिकसह भारताची मान उंचावली आहे. 16 ते 20 जूनदरम्यान इगतपुरी येथील ग्रँड गार्डन रेसोर्ट येथे त्यांनी मॅरेथॉन योगाला सुरुवात केली होती. 16 जूनला पहाटे साडेचार पासून त्यांनी योगाला सुरुवात केली त्यानंतर आज 20 जून रोजी सकाळी साडेआठ वाजता बरोबर 100 तासांनी त्याची सांगता झाली आणि त्यांच्या नावावर एक नवा विक्रम नोंदिवला गेला.
या काळात त्यांनी केवळ द्रव पदार्थाचे सेवन केले. या आधीचा विक्रम 57 तासांचा असून तामिळनाडूच्या के.पी.रचना यांच्या नावे होता. तो प्रज्ञा पाटील यांनी 18 तारखेलाच सलग 58 तास योगा करून मोडीत काढला.उद्योजिका असलेल्या प्रज्ञा पाटील मुळच्या रावेर जि.जळगाव येथील असून उद्योग व्यवसायानिमित्त त्या नाशिकला स्थायिक झाल्या आहे. त्यांनी योग शास्त्रात एम ए देखील पूर्ण केले असून त्या सद्या पीएचडी करत आहेत.त्यांना योगगुरू विश्वासराव मंडलिक यांचे मार्गदर्शन लाभले.