Breaking News

गंगा नदीच्या सफाईसाठी 10 वर्षे लागणार - उमा भारती

फरुखाबाद, दि. 05 - संपूर्ण गंगा नदीची खोलवर सफाई करायची असेल तर 10 वर्षांचा कालावधी लागेल, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी सांगितले.  उत्तर प्रदेशमधील फरुखाबाद येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 
त्या म्हणाल्या की, गंगा नदीच्या सफाईसाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. गंगा नदीच्या किनारी असलेले उद्योग अन्य जागी उभारण्यात येतील. यासंदर्भातील  आराखडा तयार करण्यात आला आहे. गंगा नदी स्वच्छ झाल्यानंतर तिचे पावित्र्य जपण्यासाठी जनजागृती मोहीमेची आवश्यकता आहे. यासाठी मी स्वत: पदयात्रेचे  आयोजन करणार आहे, असे त्यांनी नमूद केले.