पुणे शहराच्या गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ब्रँडिग करणार - महापौर
पुणे, दि. 05 - पुणे शहराचा गणेशोत्सव यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत असून त्यानिमित्ताने पुणे शहराच्या गणेशोत्सवाचे ब्रँडिंग असल्याचे महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक यांनी शनिवारी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहिर केले. शहरातील गणेशोत्सव यंदा 125 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याविषयी महापौर सौ. मुक्ता टिळक यांनी स्वत: पुढाकार घेऊन काल शनिवारी सायंकाळी केसरीवाड्यात लोकमान्य सभागृहात पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या बैठकीस श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष निलेश वकील, दगडूशेठ गणपती मंडळाचे उपाध्यक्ष सुनिल रासने, खजिनदार महेश सूर्यवंशी, नगरसेवक हेमंत रासणे, सेवा मित्र मंडळांचे शिरीष मोहिते, अखिल हत्ती गणपत्ती मित्र मंडळांचे अध्यक्ष व माजी नगरसेवक शाम मानकर, नातूबाग मित्र मंडळाचे प्रमोद कोंढरे, विवेक खटावकर, नितिन पंडीत, भाऊसाहेब करपे, भाई कात्रे, योगेश पिंगळे, पुणे महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, पुण्याचे सहपोलिस आयुक्त रविंद्र सेनगांवकर , अनेक पोलिस अधिकारी व 150हून अधिक मंडळांचे कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.
महापौर सौ. मुक्ता टिळक यांनी या बैठकीत सांगितले की, लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश सरकारविरूध्द लढा देण्यासाठी विविध आंदोलने केली. गणेशोत्सव व शिवजयंती सुरु करून लोकांमध्ये जनजागृत्ती केली. गणेशोत्सवाच्या चळवळीस यंदा 125 वे वर्ष सुरु होत आहे. त्यानिमित्तान विविध कार्यक्रम आयोजित करावयांचे आहेत. पुणे शहरातील गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात, देशात आदर्शपध्दतीने साजरा केला जात आहे. तो आणखी चांगल्या पध्दतीने व्हावा, कार्यकर्ते, पुणे मनपा व पोलिस खात्याचे अधिकारी यांच्यात समन्वय साधला जावा यादृष्टीने गणेशोत्सवाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच पुण्याच्या गणेशोत्सवाचे नांव सर्वदूर झाले आहे. गणेशोत्सवाचे ब्रँडिंगही केले जाणार आहे.याविषयी कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले.
पुण्याचे सहपोलिस आयुक्त सेनगांवकर म्हणाले की, कार्यकर्त्यांना परवानगी व अन्य येणा-या अडचणींविषयी लवकरच पोलीस खात्याची बैठक घेतली जाईल. गणेशोत्सवापूर्वी ढोल-ताशा वाद्यपथकांना सराव करण्याविषयी धोरण ठरविले जाईल.
पुणे मनपाचे उपायुक्त मोळक म्हणाले की, नागरिकांची सुरक्षाव्यवस्था व पर्यावरणविषयक कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जातील.
या बैठकीत विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणांत सूचना करताना सांगितले कि, माजी महापौरांची परिषद आयोजित करण्यात यावी,गणेशोत्सवाच्या काळात स्वागत कमानी उभाराव्यात. 125 व्या वर्षांनिमित्त गणेशोत्सव हायटेक पध्दतीने साजरा करण्याविषयी विचार व्हावा. गणेशोत्सवाच्या काळात 10 दिवस ध्वनीवर्धक (साऊंड) सुरु ठेवण्यास व देखावेही रात्री 12 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान केला जावा. परवानगीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज घेण्याची पध्दत पुणे मनपा व पोलिसांनी सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. समन्यवय समिती नेमण्यात यावी.
या बैठकीत श्री. अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, योगेश पिंगळे, भाऊसाहेब करपे, शिरीष मोहिते, वकिल, शाम मानकर, प्रमोद कोंढरे, आनंद सराफ आदींची सूचना करणारी विविध भाषणे झाली.