Breaking News

बांगलादेश सीमेवर 5 लाखांच्या बनावट नोटा जप्त

मालदा, दि. 05 - पश्‍चिम बंगालमधील मालदा येथे भारत-बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाने 4 लाख 98 हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या. जप्त  करण्यात आलेल्या नोटांमध्ये 2 हजारांच्या नोटांचा समावेश आहे. रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. मात्र याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक  करण्यात आलेली नाही. 
बांगलादेशमधून बनावट नोटा भारतात आणल्या जात असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर केलेल्या कारवाईदरम्यान या नोटा  जप्त करण्यात आल्या. मात्र या नोटांची तस्करी करणारे नोटा तेथेच टाकून पसार झाले असल्याचे अधिका-यांनी सांगितले. यासंदर्भात तपास सुरू करण्यात आला  असून फरार तस्करांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.