शेतकर्यांच्या संपास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा
अकोले, दि. 29 - जून 2017 पासून शेतकर्यांचा संप सुरु होत आहे. शेतकर्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत अनेकवेळा आंदोलने, मोर्चे काढूनही या नतद्रष्ट सरकारवर कोणताही परिणाम झालेला नसल्याने अडचणीत आलेल्या शेतकर्यांना कर्जमाफी, शेतीमालास हमीभाव मिळण्यासाठी राज्यव्यापी संप सुरु होत आहे. तरी अकोले तालुक्यातील सर्व शेतकर्यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या संपात सहभागी व्हावे असे आवाहन अकोले तालुक्याचे कृतिशील व गतिमान नेतृत्व आ. वैभवराव पिचड यांनी केले आहे.
आज कोणत्याही शेतीमालास भाव नसल्याने कांदे, टोमॅटो, डाळींब, भाजीपाला आदींचे भाव प्रचंड प्रमाणात कोसळल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. शेतकरी कर्जबाजारीपणामुळे रोजच आत्महत्या होत आहेत. जिल्हा सहकारी बँकेकडे नोटाबंदीच्या काळात जमा झालेली रक्कम अद्यापपर्यंत रिझर्व्ह बँकेने स्विकारलेली नाही.
त्यामुळे शेतकर्यांचा मुख्य आधार असलेल्या सहकारी बँका अडचणीत आणण्याचे काम सध्याचे सरकार करीत आहे. त्यामुळे शेतकर्यांना कर्ज देणे दुरापास्त झालेले आहे.
शेतकरी बांधवांच्या कष्टाची किंमत, त्यांचे महत्व सरकारला समजण्यासाठी ह्या संपाची गरज आहे. शेतकर्यांनी या संपात पूर्ण ताकदीनिशी उतरावे. कोणीही आपला शेतमाल व दूध बाजारात विकण्यास आणू नये. कोणत्याही दूध संस्थेला दुध पुरवठा करु नये, परराज्यातून येणार्या शेतमालास सिमेवर रोखून ठेवावे, भाजप प्रणित शेतकर्यांना शेतमाल विक्रीस विरोध करावा, भाजीपाला, दुधाची वाहतूक करणार्या ट्रान्सपोर्टला रस्त्यावर अडवावे, शेतकरी संपावर गेल्यावर काय होते, हे सरकारला समजणे गरजेचे आहे.
या सर्व बाबींचा विचार करता अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कार्यकर्ते या संपात सहभागी होणार असून या संपास पूर्णपणे पाठींबा देत आहोत असे आमदार पिचड म्हणाले.