Breaking News

खा. उदयनराजेंच्या राजकीय कारकिर्दीला मीच पूर्ण विराम देणार : संदीप मोझर

सातारा, दि. 04 - गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपी असणारे खा. उदयनराजे भोसले यांना केसाने गळा कापायची जुनी सवयच आहे. पाठीत खंजीर खुपसून राजकररण करीत माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा त्यांनी पोलिसात हजर राहावे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मीच पूर्णविराम देणार असून सध्याची टर्म ही त्यांची शेवटचीच खासदारकी आहे. बेताल वक्तव्ये करण्यापेक्षा त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द वाचवावी व भुंकणारी तुमची कुत्री आवरावीत असे स्पष्ट प्रतिपादन मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांनी केले आहे.
खा. उदयनराजेंच्या अटकेची मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांनी केलेल्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या समर्थकांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकारांना उत्तर देताना संदीपदादा मोझर यांनी ही टीका केली आहे.
उदयनराजेंच्या बगलबच्च्यांनी माझ्यावर आरोप करु नयेत. माझ्यावर टीका करण्याची त्यांची पात्रताच नाही. 1997 च्या बॅचचा कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनियरींग कॉलेजचा मी टॉपर आहे. तेथील बोर्डवर माझे नाव दिसेल. उदयनराजे फरार असल्याने त्यांनी ती यादी वाचता येणार नाही. मात्र त्यांच्या बगलबच्च्यांनी माझे शैक्षणिक गुणवत्तेचे बोर्ड कॉलेजमध्ये जावून कोणाकडून तरी वाचून घ्यावेत. नान्या, बन्यासार-या ओवाळून टाकलेल्यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही अशी टीका करुन संदीपदादा मोझर यांनी प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मी कारागृहात असूनही मला 18,600ते मिळाली होती. माझ्या वाढत्या राजकीय वर्चस्वाची भीती वाटूनच खोट्या गुन्ह्यात अडकवून मला 22 महिने गजाआड, ठेवण्याचा डाव उदयनराजेंनी खेळला. जिल्हा रुग्णालयातील व्हीआरपी सूटमधून अशोक सावंतला जेलमध्ये हलवावे कारण आता तो आलिशान सूट उदयनराजेंसाठी खाली करावा लागेल कारण यापूर्वीही याच कक्षात त्यांनी 22 महिने मौजमजा केली होती. मात्र आता त्यांचा घडा भरत आला असून नियतीच त्यांना धडा शिकवेल, असेही या पत्रकाच्या शेवटी संदीपदादा मोझर यांनी म्हटले आहे.