Breaking News

काश्मीरच्या दोदा जिल्ह्यात विशेष तपास पथकाच्या पोलीस चौकीवर हल्ला

श्रीनगर, दि. 09 - काश्मीरच्या दोदा जिल्ह्यातील विशेष तपास पथकाच्या एका पोलीस चौकीवर काही अज्ञातांनी गोळीबार केला आहे. यामध्ये दोन पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. दोदा जिल्ह्याच्या डोंगराळ भागात असणार्‍या या चौकीवर आज पहाटेच्या सुमारास हल्ला झाला. विशेष तपास पथकाच्या चौकी परिसरात गोळीबार केल्याचा आवाज आल्यानंतर तेथे किकर सिंग आणि मोहम्मद युनुस हे पोलीस अधिकारी जखमी अवस्थेत आढळून आले. यापैकी किकर सिंग यांच्या मानेत तर मोहम्मद युनुस यांच्या पोटात गोळी लागल्याची माहिती पोलीस अधिका-याने दिली. या दोघांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.