काश्मीरमध्ये विद्यार्थ्यांना दगडफेकीसाठी पैसे पुरवले जातात
जम्मू, दि. 09 - जम्मू काश्मीरमध्ये विद्यार्थ्यांना दगडफेकीसाठी पैसे पुरवले जात असल्याचा दावा काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक एस.जे.एम. गिलानी यांनी केला. पालकांनी आपल्या मुलांची समजूत घालावी, असा सल्लाही गिलानी यांनी दिला.
दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी बँक लुटून पैसे चोरल्याच्या घटना घडल्या होत्या. या मागे लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे गिलानी यांनी सांगितले. काश्मीरमध्ये सध्या 200 दहशतवादी लपून बसले आहेत. त्यापैकी 110 दहशतवादी हे स्थानिक असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी संघटना विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष निर्माण करून सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करण्यासाठी पैसे पुरवत आहे, असेही गिलानी म्हणाले.