Breaking News

पाकच्याउल्लंघनाला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर

श्रीनगर, दि. 09 - काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये सोमवारी सकाळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीचे उल्लंघनाचे भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहेत. यावेळी भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकच्या सीमारेषेवरील चौक्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या यासाठी भारतीय सैन्याने अँटी टँक गायडेड मिसाईल्सचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. भारतीय सैन्याकडून या कारवाईची चित्रफित प्रसिद्ध करण्यात आली आहे. या चित्रफितीत भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांवर सात क्षेपणास्त्रे डागल्याचे दिसत आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी बंकर्स पूर्णपणे उद्धस्त झाल्याचेही दिसत आहे.
भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे नेमके कोणत्या प्रकारचे नुकसान झाले याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या महिन्यात पाककडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. 1 मे रोजी मेंढर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.