कपिल मिश्रा यांनी केलेले आरोप बिनबुडाचे - मनीष सिसोदिया
नवी दिल्ली, दि. 08 - कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचेअसल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केली. केजरीवाल यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन टीका होत असताना सिसोदिया यांनी केजरीवाल यांची पाठराखण केल्याचे समजते.
आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी माझ्यासमोरच अरविंद केजरीवाल यांना दोन कोटी रूपये दिल्याचा आरोप दिल्लीच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले कपिल मिश्रा यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सिसोदिया बोलत होते. प्रतिक्रिया देण्यासारखे हे आरोपनसून अशा आरोपांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. केजरीवाल यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत, असेही सिसोदिया म्हणाले.