Breaking News

केजरीवाल भ्रष्टाचार करणे शक्यच नाही - कुमार विश्‍वास

नवी दिल्ली, दि. 08 - दिल्लीचे मुख्यमंत्री एजरीवाल भ्रष्टाचार करतील हे मी कधीच मान्य करू शकणार नाही. केजरीवाल यांचे विरोधकही हे मान्य  करतील, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्‍वास यांनी व्यक्त केली.
दिल्लीचे माजी पर्यटन मंत्री कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. केजरीवाल यांना आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दोन कोटी रुपये दिले  असून हा संपूर्ण प्रकार माझ्यासमोर घडला असल्याचा दावा कपिल मिश्रा यांनी केला. या पार्श्‍वभूमीवर विश्‍वास यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. केजरीवाल  भ्रष्टाचार करतील किंवा लाच घेतील असा विचारही मी कधी करू शकत नाही, असेही विश्‍वास म्हणाले. कपिल मिश्रा यांच्या आरोपानंतर काँग्रेस आणि भारतीय  जनता पक्षाने ‘आप’वर टीका केली आहे.