भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी
नवी दिल्ली, दि. 08 - दिल्लीच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीव्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी केजरीवालांकडे मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांना दोन कोटी रुपये देताना आपण बघितले असल्याचे कपिल मिश्रा यांनी सांगितले आहे. एका जमीन व्यवहाराप्रकरणी सत्येंद्र जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिले होते.
केजरीवालांनी काँग्रेस पक्षावर आरोप करण्यापूर्वी स्वत:वर करण्यात आलेल्या आरोपांकडे लक्ष द्या, असा खोचक सल्ला काँग्रेस पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी दिला आहे. आतापर्यंत आम आदमी पक्षाच्या चार मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तर सहा मंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहेत.
कपिल मिश्राच असा आरोप करत आहे, याचाच अर्थ जे लोक भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यावर भाषणे, सभा घेतात तेच लोक भ्रष्टाचारामधील एक भाग आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे नेते विजेंद्र गुप्ता यांनी म्हटले.
11 महिन्यांपर्यंत टँकर घोटाळ्याचे कागदपत्रे का उघड केले नाहीत, तर त्यावर भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण असून ते लवकरच समोर आणायचे आहे अशी उत्तरे केजरीवाल यांनी दिली होती.
आम आदमी पक्षाचे नेते सत्तेसाठी आंधळे झाले आहेत. त्यामुळे ते कधीही पदाचा राजीनामा देणार नाहीत, असे भारतीय जनता पक्षाचे नेते प्रभात झा यांनी सांगितले.