सत्यपाल महाराज व श्रीमंत कोकाटे यांच्यावरील हल्ल्यांची सीआयडी मार्फत चौकशी करा!
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेची मागणी
बुलडाणा, दि. 22 - अंधश्रद्धा निर्मुलन व समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज व जेष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचेवर हल्ला करण्याच्या वृत्तीमागे सनातनी प्रवृतीचा हात असण्याची शक्यता असल्याने या हल्ल्यांची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या वतीने तहसिलदार व लोणार ठाणेदारांमार्फत शासनाकडे करण्यात आली.तहसिलदार व ठाणेदारांच्या मार्फत शासनाकडे वाठविण्यात आलेल्या निवदेनात नमुद आहे की, देशात व विशेषत: महाराष्ट्रात काही समाजविघातक जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत अंधश्रद्धा निर्मुलन व समाज प्रबोधन करणार्या सत्यपाल महाराज व जेष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्यावर राजरोसपणो हल्ले करीत आहेत. यामुळे समाजात दुही निर्माण होत असून देशाच्या अखंडतेला व राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण झाल्याचे निवेदनात नमुद असून अशा प्रवृतीना तात्काळ आळा घालण्यात येवून या हल्ल्यांचा सीआयडी मार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद यांच्या वतीने अॅड. भागवत मापारी, अॅड. तनपुरे, विलास मापारी, ओमप्रकाश घायाळ, आंनदराव चानखोरे, नितीन शिंदे, बंडू पाटील, अतिश जवंजाळ, शशिकांत जाधव, देवराज ठाकूर, दिपक चौधरी, सागर सिरसाट, ए.ए.ढोणे, बी. एम. घारोड, अक्षय खडसे, पवन गांजरे यांनी केली आहे.