पेरणीपूर्व मशागतीला आला वेग!
बुलडाणा, दि. 26 - चिखली तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र खरीप हंगामाचे असून त्यात कोरडवाहू क्षेत्र अधिक आहे. हवामान खात्याच्या दिलासादायक अंदाजानुसार शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. तर काही शेतकरी आपली तूर विकल्या जात नसल्यानेचिंतातूर झाले आहेत. गत वर्षीच्या हंगामात तुरीचे सर्वाधिक उत्पन्न निघाल्याने शेतकरी राजा समाधानी होता. परंतु बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे बाजार समिती हमीभाव, नाफेड केंद्रावरील अडचणी निर्माण झाल्यामुळे हजारो क्वींटल तूर अद्यापही शेतकर्यांच्या घरी पडून आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी पावसाळ्यापूर्वी शेत जमीन तयार करण्याच्या कामात सध्या शेतकरी वर्ग गुंतला असल्याचे चित्र आहे. सध्या शेतशिवारात सुरु असलेल्या लगबगीवरुन शेतकर्यांना यंदाही भरघोस उत्पन्न होईल अशी अपेक्षा दिसून येत आहे. नोटबंदीच्या संकटाचा सामना केल्यानंतर शेतकर्यांना लगेच तुर विक्रीच्या संकटाला तोंड द्यावे लागले. यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेला शेतकरी राजा यंदाच्या शेतीसाठी खर्च कसा करायचा या चिंतेत आहे. तर काही शेतकरी घरातील इतर धान्यांची विक्री करुन तर काही उसनवारीने पैसे घेवून अथवा दागदागिने गहाण ठेवून काळ्या आईची ओटी भरण्याची तयारी करीत आहेत. सध्या शेतामध्ये पेरणीपूर्व मशागतीचे कामे नांगरणी, वखरणी अशी कामे बहुतांश शेतकर्यांकडे बैलजोडी नसल्याने व वेळ वाचावा म्हणून ट्रॅक्टरद्वारे कामे करीत आहेत. हा खर्च तसेच बी-बियाणे खरेदीसाठी लागणारा खर्च हा रोख रकमेच्या स्वरुपात करावा लागतो म्हणून काही शेतकरी सावकारांकडून टक्केवारीने पैसे घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. तर काही शेतकरी कर्जासाठी बँकांच्या फेर्या घालत आहेत. यावर्षी पुरेसा पाऊस पडेल असा अंदाज वेध शाळेने वर्तविल्यामुळे शेतीला आणि शेतकर्यांसाठी चांगले दिवस येतील, अशी आशा बाळगून शेतकरी हे भरपूर उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. एवढे करुनही जर वरुन राजाने साथ दिल्यास भरपूर उत्पन्न मिळाल्यावर योग्य भाव न मिळाल्यास पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होईल म्हणून शेतीपूरक व्यवसायासाठी शासनाच्या वतीने मोठे प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा काही शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.