पोलिसांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दिग्विजय सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल
नवी दिल्ली, दि. 05 - तेलंगणा पोलिसांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात तेलंगणा पोलिसांनी दिग्विजय सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणा पोलीस मुस्लिम तरूणांना इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारे संकेतस्थळ चालवत असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी मुस्लिम तरुणांना तेलंगाणा पोलिसांकडून उकसवले जात असल्याचा आरोप करणारे ट्विट सिंग यांनी सोपवारी केले होते. याबाबतचे आदेश मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्याच्या पोलिसांना दिले असल्यास त्यांनी जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा. नाहीतर चौकशीकरून दोषींवर कारवाई करावी, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. अशा प्रकारचे आरोप करून पोलिसांची प्रतिमा मलिन करून, त्यांचे खच्चीकरण केले आहे, असे तेलंगणातील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले.