Breaking News

मतदान यंत्रांबाबत निवडणूक आयोगाकडून 12 मे रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

नवी दिल्ली, दि. 05 - निवडणूक आयोगाने 12 मे रोजी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली असून या बैठकीत मतदान यंत्रांबाबत घेतल्या जाणार्‍या शंकांचे निरसन केले जाणार आहे . मतदान यंत्रांच्या अचुकतेबाबत तब्बल 16 विरोधी पक्षांनी प्रश्‍न उपस्थित केले होते.
दरम्यान, जे पक्ष मतदान यंत्रांबाबत आक्षेप नोंदवत आहेत, त्यांच्या शंका दुर करण्याचा प्रयत्न या बैठकीत आयोगाकडून केला जाणार आहे. आम्ही लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलवणार असून आपली मतदान यंत्रे कशा प्रकारे सुरक्षित आहेत, हे आम्ही त्यात पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे मुख्य निवडणूक आयुक्त नासीम झैदी यांनी सांगितले होते. त्या पार्श्‍वभूमीवर 12 मे रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सर्वप्रथम मतदान यंत्रांतील त्रुटींबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर अन्य काही पक्ष्यांच्या नेत्यांनीही मतदान यंत्रात फेरफार होत असल्याचा आरोप केला होता.