जळगावात रेल्वे तिकीट विक्रीचा काळाबाजार उघड
जळगाव, दि. 26 - रेल्वे प्रशासनाकडून मान्यताप्राप्त खाजगी एजंटकडून तिकीटाची जास्तीच्या दराने विक्री केली जात असल्याची गोपनीय माहितीवरून सतर्कता विभाग, वाणिज्य विभाग,आरपीएफ भुसावळ, जळगाव यांनी संयुक्तरित्या बुधवारी करून मयूर सोनी या संशयित एजंटच्या दुकानातून बनावट तिकीटासह साहित्य जप्त केले. तसेच संशयीतास ताब्यात घेतले. दुपारपासून हाती घेण्यात आलेली कारवाई सायंकाळ उशिरापर्यंत सुरू होती.
बालाजीपेठ येथील दुकानात पर्सनल आयडीवरून ई तिकीट काढून लोकांना दोनशे ते तीनशे प्रति व्यक्ति देऊन तिकीटाची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती रेल्वेच्या सतर्कता विभागाला मिळाली होती. त्याअनुषंगाने आज दुपारी संयुक्तपणे येथे छापा टाकून आरक्षणाचे काऊन्टरवरील चार तिकीटे किंमत एकुण 2 हजार 995 रूपये, साती तिकीट किंमत 20 हजार 70 रूपये असा एकूण 23 हजार 65 रूपयांचे तिकीट जप्त करून पथकाने एकुण 11 तिकीटे सील केली. याशिवाय या गुन्हयात वापरातील लॅपटॉप, प्रिंट मशीन जप्त केले. तसेच दुकान मालक मयूर सोनी यास अटक केली. गुरूवारी त्यास भुसावळ न्यायालयात हजर करण्यात येईल.
पथकात यांचा होता समावेश
व्हिजेलन्स मुंबई पो.नि. अतुल क्षीरसागर, आयडीएफ, सीआयबी, बीएसएलचे अतुल टोके, डीवाय. सीटीआय, एटीएस, बीएसएलचे प्रशांत ठाकुर, एसआयपीएफ चे के.बी.सिंह, आरपीएफचे गोकुळ सोनोनी, फरयाद खान, तसेच प्रशांत ठाकुर, डी.के. सोनवणे, निलेश अडवाल, सुनिल बोरसे,रेहान सैय्यद,नाना सोनवणे यांच्या सयुक्त पथकाने ही कारवाई केली. याकामी शनिपेठ पोलीसांचे सहकार्य घेण्यात आले.
दरम्यान मनपा समोरील विकास बिर्ला यांच्या विकास मशिनरी या दुकानात रेल्वे तिकीट विक्री दरम्यान बनावट पध्दतीने तिकीट विक्री केली जात असल्याची माहिती रेल्वे पोलीसांना मिळाली होती. रेल्वे पोलीसांनी येथे 09 एप्रिल रोजी कारवाई करून हा प्रकार उघडकीस आणला होता. त्याच पध्दतीची कारवाई आज पथकाने शहरातील बालाजीपेठेत करून गैरप्रकार उघडकीस आणला. करून एका बुकींग एजंटास ताब्यात घेतले. या कारवाईने तिकीट बुकींग करणार्या एजंट वर्गात खळबळ उडाली.