सीआयएसएफ जवानाचा रेल्वेत संपर्क तुटल्याने खळबळ
जळगाव, दि. 26 - सुटी काढुन आलेला सीआयएसएफचा जवान परत डयूटीवर दिल्ली येथे जाण्यासाठी रविवारी रेल्वेने जळगाव येथून निघाला परंतु जवान दिल्लीपर्यंत पोहोचलाच नसल्याचे कळाल्यावर जवानाच्या नातेवाईकांनी बुधवारी शोध मोहिमेला गती दिली. जवान वेल्हाणे (पारोळा) येथील मुळ रहिवासी आहे.असल्याचे सांगून तो वेल्हाणे येथुन जळगाव रेल्वेस्थानकावर आला. सायंकाळी फलाक क्रमांक तीनवरून तो सचखंड एक्सप्रेसमध्ये सायंकाळी 06.30 वाजता बसला.नंतर 06.35 वाजता निलेश याने मोठे बंधु कमलेश पाटील यांना मोबाईल लावून गाडीत बसल्याची माहिती दिली. नंतर कमलेश पाटील यांचे निलेश याच्याशी 06.5 वाजता बोलणे झाले.
नाना पाटील (वडील), भाऊ कमलेश पाटील (भाऊ) सह अन्य नातेवाईकांनी आज लोहमार्ग पोलीस स्टेशन तसेच आरपीएफ स्टेशन गाठुन जवानाशी संपर्क होत नसल्याने हरविल्याची तक्रार घेण्याची विनंती केली. तसेच रविवार दि. 21 मे रोजीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याविषयी विनंती केली. निलेश हा अविवाहित आहे.संपर्क तुटला
दरम्यान जवान निलेशचे वडील नाना पाटील यांनी मुलगा नेमका कुठपर्यत पोहोचला,हे जाणुन घेण्यासाठी सोमवार दि.22 मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यावेळी मोबाईल रिसीव्ह झाला नाही. तर याच दिवशी सकाळी साडेअकरावाजता वेल्हाणे येथील मित्राने निलेशच्या मोबाईलवर संपर्क साधला, त्यावेळी आपण आग्रापर्यत पोहचल्याचे तो बोलला होता. परंतु नंतर त्याचा संपर्क तुटला.दिल्लीहून विचारणा
दरम्यान रजा संपल्यावरही निलेश सेवेत दाखल झाले नाहीत? अशी विचारणा सीआयएसएफ कट्रोल रूम दिल्ली येथुन विचारणा करण्यात आली. परंतु निलेश हा रविवार दि. 21 मे रोजीच दिल्लीकडे जाण्यासाठी निघाल्याचे वडील नाना पाटील यांनी माहिती दिली. नंतर कट्रोल रूममधुन ही माहिती वरीष्ठांना देण्यात आली असून त्यांनी जवानाच्या तपासाला गती दिली आहे.