पाच लाख विक्रमी खपाचा संस्कारधारा नित्यपाठ
सातारा, दि. 26 - आधुनिक जीवनशैली संस्कार हरवत चालले आहेत अशी खंत नेहमीच व्यक्त केली जाते. पण या गृहितकाला धक्का देत संस्कारधारा नित्यपाठ हे पॉकेट बुक रौप्यमहोत्सव दिमाखात साजरा करत आहे.
साता-यातील नामवंत गोडबोले कुटूंबातील डॉ. अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकाचे संकलन आपल्या चैतन्य या मुलाच्या मुंजीत येणा-यांना भेट देण्यासाठी केले. या पुस्तकामध्ये प्रांतस्मरण, प्रार्थना, गणेशस्तोत्रे, अथर्वशीर्ष, भीमरूपी, रामरक्षा, सुर्यनमस्कार, गायत्री हे मंत्र विविध देवदेवतांच्या आरत्या, मंत्रपुष्पाजली, निवडक मनाचे श्लोक आणि पसायदान यांचे संस्कारक्षम संकलन केले. कौशिक प्रकाशनचे संचालक अरूण गोडबोले यांनी हे पुस्तक नवीन पिढीतल्या प्रत्येकाच्या हाती जावे म्हणून 1992 साली पहिली आवृत्ती प्रकाशित केली. गेल्या 24 वर्षात या पुस्तकाचे एवढे स्वागत झाले की दरवर्षी 5 हजार ते 10 हजार प्रतींच्या एक/दोन आवृत्त्या काढाव्या लागल्या. अनेक व्यक्ती, शाळा यांनी हे पुस्तक घेवून भेट दिले. या प्रचंड प्रतिसादामुळे आज खपाचा आकडा 5 लाख प्रतिंच्या विक्रमाजवळ पोहोचला आहे. जगात जेथे मराठी माणूस आहे तेथे हे पुस्तक पोहोचले आहे. यंदाचे पुस्तकाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून बालक आणि पालकांनाही ते नाममात्र अशा 10 रूपयाच्या किमतीत सर्वत्र उपलब्ध आहेत. यामध्ये नफयाचा हेतू नसून संस्कार प्रसार हाच प्रधान हेतू असल्याचे अरूण व डॉ. अच्युत गोडबोले यांनी सांगितले. इच्छुकांनी संबंधित पुस्तक मिळविण्यासाठी 02162-230114 या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.