Breaking News

आधी तिकीट आरक्षित करा नंतर पैसे भरा, रेल्वेची नवी योजना

मुंबई, दि. 01 - कॅश ऑन डिलिव्हरीच्या योजनेनंतर भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने रेल्वे प्रवाशांसाठी ‘बाय नाऊ, पे लॅटर’ही नवी योजना  आणली आहे. यानुसार रेल्वेचे तिकीट आधी आरक्षित करुन नंतर पैसे देता येणार आहेत.
या नव्या योजनेमुळे तिकीट आरक्षण करताना पैसे भरण्याच्या प्रक्रियेपासून प्रवाशांना सूट मिळेल. ई-पे लेटरच्या माध्यमातून ही योजना आणण्यात आली आहे.  तिकीट आरक्षित केल्यानंतर 14 दिवसात भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन कधीही पैसे भरता येणार आहेत. या सुविधेचा  वापर करण्यासाठी आधार कार्ड आणि पॅनकार्डची माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एकदाच वापरण्याजोगा सांकेतांक  (ओटीपी) येईल. त्यानंतर प्रवाशांना तिकीट आरक्षित करता येणार आहे.