कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारतीय नौदल सज्ज - सुनील लांबा
नवी दिल्ली, दि. 01 - भारतीय नौदल कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे नौदल प्रमुख डमिरल सुनील लांबा यांनी म्हटले. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 132 व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. सध्या तीन्ही दलांमध्ये केवळ एकदाच संयुक्त सराव केला जात आहे. मात्र, यापुढे संयुक्त सरावात वाढ होणार आहे, असे ते म्हणाले. सध्याची परिस्थिती पाहता अचानक आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी नौदल पूर्णपणे तयार आहे. नौदल कोणत्याही आव्हानाला उत्तर देण्यासाठी तयार आहे. भारत सरकार जी जबाबदारी सोपवेल ती योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी आम्ही तयार आहोत, असेही ते म्हणाले.
भारतीय लष्कराचे पारंपरिक साहित्य आणि शस्त्रांस्त्रांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने विचार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शेकटकर समितीच्या शिफारशींबाबत बोलताना ते म्हणाले की, शेकटकर समितीने आपला अहवाल सरकारकडे सुपुर्द केला आहे. संरक्षण मंत्रालय व तीन्ही संरक्षण दल संयुक्तपणे आणि परस्पर सहकार्याने काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत आहेत, असे ते म्हणाले.