Breaking News

महाभारताबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कमल हसनची न्यायालयात धाव

नवी दिल्ली, दि. 05 - कनिष्ठ न्यायालयामध्ये आपल्या विरोधात दाखल आलेली तक्रार फेटाळली जावी या मागणीसाठी अभिनेता कमल हसन याने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हिंदू महाकाव्य म्हणून ओळखल्या जाणा-या महाभारताबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल हसन यांच्यावर खटला चालवला जावा अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली होती. हसन यांनी एका वाहिनीवरील मुलाखतीत महाभारताबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली होती. यानुसार तिरूनेलवेली जिल्ह्यातील वेल्लौर दंडाधिकारी न्यायालयाने हसन यांना 5 मे ला न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ही फक्त त्या कार्क्रमात झालेल्या चर्चेचा भाग होता. माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता असे कमल हसन याने सांगितले.