एका जवानाच्या बदल्यात पाकिस्तानच्या 100 जवानांचा शिरच्छेद रामदेव बाबा
नवी दिल्ली, दि. 05 - शहिद झालेल्या एका जवानदल्यात पाकिस्तानमधील 100 जणांचा शिरच्छेद करायला हवा असे वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे. भारत-पाक सीमेवर घडलेल्या शहिद भारतीय जवानांच्या विटंबनेच्या घटनेवर त्यांनी आज प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानी सैनिकांकडून करण्यात आलेल्या या क्रूर कृत्याचा बाबा रामदेव यांनी निषेध केला आहे. पतंजलीच्या वार्षिक पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, आपण इस्त्रायल देशाच्या नीतीचा अवलंब करत पाकिस्तानने जर भारतीय जवानाचे एक शिर कापले, तर आपण त्यांची 100 शिरे कापली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. जवान शहीद झाल्य्यांच्या कुटुंबियांचे दु:ख मी पाहिले आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.