Breaking News

उ.प्र.मध्ये दोन अल्पवयीन बहिणींवर सामुहिक बलात्कार

मुझफ्फरनगर, दि. 26 - उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे दोन अल्पवयीन बहिणींवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पाच जणांना अटक  करण्यात आली आहे. 22 मे रोजी हा प्रकार घडला. मुझफ्फरनगरमधील नावला या गावातील दोन बहिणी रेशन दुकानावर सामान आणण्यासाठी गेल्या होत्या.  त्यावेळी दुकानदाराचा मुलगा राहुल याने मित्रांच्या साथीने दोघींना निर्जन जागी नेऊन बंदुकीच्या धाकावर त्यांच्यावर सामुहिक बलात्कार केला. दुस-या दिवशी  मुलींनी घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यावर या संदर्भात त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार राहुलसह त्याचे मित्र राजन, सचिन,  रोहित आणि अंकित यांना पोलिसांनी आज अटक केली.