मालेगाव महापालिका निवडणूक : काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर
मालेगाव, दि. 26 - मालेगाव महापालिकांचे कल हाती येऊ लागले आहेत. मात्र, अद्याप कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. तर सध्या काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर आहे तर राष्ट्रवादी 24 जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे एमआयएमनंही जोरदार मुसंडी मारली असून त्यांनी देखील 11 जागी आघाडी घेतली आहे.
21 प्रभागातून 84 उमेदवार महापालिकेवर निवडून जाणार आहेत. गेल्या वर्षी काँग्रेस आणि तिसरा महाज एकत्रित यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. यावेळी राष्ट्रवादी आणि जनता दलाची युती झाली असून तिसरा महाज राष्ट्रवादीसोबत लढत आहेत. तर काँग्रेस, भाजप आणि शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत.