Breaking News

गिरीश महाजनांचा राजीनामा घ्या - अजित पवार

पुणे, दि. 27 - भाजप नेते गिरीष महाजन यांच्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नात गेल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित  पवारांनी महाजनांवर टीकेची तोफ डागली.
दाऊदसोबत काडीचा संबंध नसताना शरद पवारांची बदनामी केली गेली, आता मात्र सरकार मधील जबाबदार मंत्री दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला जातात. यावर  चर्चा सुरू झाल्यानंतर मात्र थातूर मातूर उत्तर दिली जात आहेत. गिरीश महाजन यांच्याकडून ही जी चूक झाली आहे, त्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला जावा, अशी  मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून वाचले त्यांना शुभेच्छा देतो, खर तर व्हिव्हिआयपी लोकांचे महत्वाच्या कामासाठी अत्यंत व्यस्त दौरे असतात. मात्र हेलीकॉप्टरची  देखभाल ठेवली जाते का हे पाहणे महत्वाचे आहे. दुर्दैवाने अपघात घडला असला तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या सुदैवाने मुख्यमंत्र्यांना काही इजा झालेली नाही. मी  परमेश्‍वराचे आभार मानतो, कुणाच्याही बाबतीत असा अपघाताचा प्रसंग उद्भवू नये, असे मत यावेळी अजित पवारांनी यावेळी व्यक्त केले.