बांगलादेशला ‘मोरा’ चक्रीवादळाचा तडाखा
ढाका, दि. 31 - चक्रीवादळ ‘मोरा’मुळे मंगळवारी बांगलादेशमध्ये मोठे नुकसान झाले असून येथील प्रशासनाने हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. 117 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहत आहे. हे वादळ येथील कोक्स बाजार व चटगावच्या मुख्य बंदरावर सकाळी सहाच्या सुमारास पोहोचले. यानंतर हे वादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे बांगलादेशच्या उत्तरेकडील खाडी, किना-यालगतची शहरे व बंदर परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.
आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे नियंत्रण कक्ष प्रवक्ता अतिरिक्त सचिव गुलाम मुस्तफा यांनी दिलेल्या माहितीसाठी जवळ जवळ तीन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
समुद्र किना-या लगतच्या लोकांना 400 तात्पुरत्या निवासस्थानी, शाळा अथवा सरकारी कार्यालयांमध्ये हलवण्यात आले असून कोक्स बाजार,चटगाव, नौखली, लक्ष्मीपूर, फेनी, चांदपूर, बारगुना, पतौखाली, भोला, बरिसाल व पीरोजपूर आदी ठिकाणी ‘मोरा’ या चक्रीवादळाचा धोका अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.