फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करणारे नियम लवकरच
मुंबई, दि. 31 - फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करणारी नियमावली लवकरच लागू करणार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंदडा यांनी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात यासंदर्भातील नियमावलीचा मसुदा सार्वजनिक करण्यात आला होता. त्यावर सूचना आणि सल्ले मागवण्यात आले होते. यामध्ये ज्या सूचना आम्हाला मिळाल्या आहेत, त्यावरून या मुद्यावरील अंतिम मार्गदर्शक तत्वे लवकरच लागू करण्यात येतील. याबाबतीत बँकांना जबाबदार धरणे आणि त्यांना उत्तर देण्यासंदर्भातील तरतुदी स्पष्टपणे समाविष्ट करण्यात येणार आहे. बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून यासंदर्भातील सुरक्षाही महत्वाची आहे, असे ते म्हणाले.