मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा टँकरची संख्या कमी
अहमदनगर, दि. 29 - जिल्हयात यंदाचा उन्हाळा बर्यापैकी सुकर गेला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राजकीय वाद न होता ज्यांना पाणी पाहिजे त्या गावांना पाण्याचे वाटप करण्यात आले. यंदा कोणत्याही ठिकाणी पाणी पेटले नाही ही विसरुन चालणान नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळा कडक असला तरी दहा टक्केच टँकरची मागणी होती असे दिसुन येते. परंतु पावसाळ्याच्या तोंडावर टंचाईने डोके वर काढले असुन टँकरची मागणी होताना दिसत आहे.
नगर जिल्हयात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची संख्या वाढत असून, 66 गावे आणि 321 वाड्यावस्त्या तहानलेल्या असल्याचे चित्र आहे. यंदा पाणी साठवण असल्याने यंदा उन्हाळा सर्वांनाच सुकर गेला असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात संगमनेर 22 टँकर, पारनेरला 27, पारनेर पंचायत 10, पाथर्डी 10, नगर तालुका 11 तर अकोले येथे 5 टँकर सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
मागील आठवड्यात पाच तालुक्यातील 53 गावे व 218 वाड्यावस्त्या व पारनेर नगरपरिषदेला 73 टँकरने पाणीपुरवठा केला जात असुन काही ठिकाणी पाणी टँकरची मागणी होत आहे. यातुन आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर टँकरची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या तेरा गाव आणि 103 वाड्यांवस्त्यांवर नव्याने टँकर सुरु झाले आहेत. नगर तालुक्यातही यंदा पावसाळा तोंडावर आला असला तरी तुरळक ठिकाणी टँकरची मागणी आहे. यंदा जलयुक्त शिवाराने सर्वांना अच्छे दिन आणले असले तरी यात अजुनही प्रबोधन झाले तर निश्चितच शिवकालीन परस्थिती निर्माण होऊन पाण्याचा नेहमी भेडसावणारा प्रश्न मार्गी लागल्या शिवाय राहणार नाही अशी परस्थिती निर्माण करण्याची गरज आहे.