Breaking News

’हनी ट्रॅप’ प्रकरण : आरोपी महिलेला एक दिवसीय न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली, दि. 08 - भारतीय जनता पक्षाचे खासदसी. पटेल यांना ’हनी ट्रॅप’ प्रकरणात अडकवणा-या महिलेला आज दिल्ली उच्च न्यायालयाने एक  दिवसीय न्यायालयीन कोठडी सुनावली. उद्या होणा-या सुनावणीदरम्यान तिला न्यायालया समोर हजर करण्यात येणार आहे. 
पोलिसांनी त्या महिलेला उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधून अटक करून तिची कसून चौकशी केली होती. महिलेने आपल्याला घरी बोलावून पेयात गुंगीचे औषध  देऊन आक्षेपार्ह छायाचित्रे आणि ध्वनीचित्रफित काढून पाच कोटी रूपयांची मागणी केली असल्याची तक्रार पटेल यांनी दिल्ली पोलिसांकडे केली होती. मात्र, त्या  महिलेने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून खासदार पटेल यांनी बलात्कार केल्याचा या महिलेने केला होता.