दिल्ली विमानतळावर विमांनाचा अपघात टळला
नवी दिल्ली, दि. 08 - दिल्ली विमानतळावर आज दोन विमानांमध्ये होणारा भीषण अपघात टळल्याचे वृत्त मिळत आहे. उड्डाणादरम्यान जेट एअरवेजचे विमान अन्य दुस-या विमानाला आदळले होते. जेट एअरवेजचे 9 डब्ल्यू 603 हे विमान दिल्लीहून श्रीनगरला उड्डाण करणार होते. याच दरम्यान ही घटना घडली. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.
