कराड तालुक्यातील शेतकर्याची आत्महत्या
कराड, दि. 5 (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील पार्ले येथील शेतकरी रमेश कृष्णा नलवडे (वय 45) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा असून त्यांच्यावर सोसायटीसह बँकचे कर्ज आहे. तसेच काही पैसे हातउसने घेतले असल्याचीही चर्चा सुरु आहे.
रमेश नलवडे सकाळी सातच्या सुमारास वैरण आणण्यास टावेल व दोरी घेवून घरातून धारकरा नावच्या शिवारात गेले होते. दुपारचे बारा वाजले तरी ते घरी परतले नाहीत म्हणून त्यांना पाहण्यासाठी मुलगा शेतात गेला. त्यावेळी शेताच्या बांधावर असलेल्या सुबाभळीच्या झाडाला रमेश नलवडे यांनी फास लावून घेतला असल्याचे त्याला दिसले.
रमेश नलवडे यांची अर्थिक परिस्थिती हालाकीची होती. त्यांनी सोसायटीचे कर्ज काढले होते. तसेच एका बँकेसह पतसंस्थेचे त्यांच्यावर कर्ज होते. या शिवाय काही जणांकडून त्यांनी हात उसणे पैसे घेतले असल्याचे बोलले जात आहे. उत्पादनाचे साधन चांगले नसल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि पत्नी असा परीवार आहे. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवलदार लावंड करत आहेत.