Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाचगणी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

सातारा, दि. 5 (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाचगणी येथील पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन फित कापून झाले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस ठाण्याच्या डायरीत संदेश लिहून पोलिसांना शुभेच्छा दिल्या.
पोलीस विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या पर्यटन पथकाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यानंतर दक्ष या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पदुम मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.