ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून पडून एकाचा मृत्यू
वाई, दि. 5 (प्रतिनिधी) : वाठार-वाई रस्त्यावरील शिरगाव घाट माथ्यावरील उताराच्या पहिल्या वळणावर ट्रॅक्टर चालकाचा टॅ्रक्टरवरील ताबा सुटल्याने खताने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या नाल्यात गेला. या अपघातात राजेंद्र दिनकर वाघमोडे यांचा जागीच मृत्यू झाला.
विडणी (ता. फलटण) येथून शेणखत भरलेल्या ट्रैक्टरला दोन ट्रॉल्या लावून घेऊन चालक दत्तात्रय शिवाजी शिनगारे (वय 32, रा. विडणी, ता. फलटण) त्यांच्या सोबत असलेले राजेंद्र दिनकर वाघमोडे (50, रा. विडणी, ता. फलटण) हे दोघेजण जोशी विहीर बाजूकडे वाठार-वाई रस्त्याने येत असताना शिरगाव घाटमाथ्यावरील दस्तुरी नावाच्या शिवारातील वळणावर ट्रॅक्टर आला होता. यावेळी चालक दत्तात्रय शिनगारे यचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याकडेला असलेल्या नाल्यात गेला. याचवेळी खताने भरलेल्या ट्रॉल्यांचा हिसका बसल्याने चालकाशेजारी बसलेले राजेंद्र वाघमोडे हे बोनेटवरून खाली पडले. त्यांच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती परिसरातील नागरिकांनी माकबाईलवरून भुईंज पोलिसांना दिली. सहाय्यक फौजदार डोंबाळे, एस. एस. गुजर, बांगर यांनी तातडीने अपघातस्थळी जावून आवश्यक ती कार्यवाही केली. मयत राजेंद्र वाघमोडे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून सपोनि बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डोंबाळे अधिक तपास करत आहेत.