दहा खेडी रुग्णसेवा योजनेचा प्रारंभ
लातूर, दि. 22 - छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वीर योद्धा संघटना व पोद्दार हॉस्पिटल-अॅक्सिडेंट अँन्ड ट्रॉमा केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दहा खेडी रुग्णसेवा योजनेचा प्रारंभ मळवटी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात करण्यात आला. अध्यक्षस्थानी उमाकांत होनराव तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. अशोक पोतदार, मळवटीचे माजी सरपंच सुधाकर शिंदे, पंचायत समिती सदस्य रघुनाथ शिंदे आणी नूतन मनपा सदस्य गौरव काथवटे उपस्थित होते. शिबीराचे उद्घाटन वीर योद्धा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत रांजणकर यांच्या हस्ते करण्यात आले. कासारगांव, कासारखेडा, मळवटी, खुलगापूर, हणमंतवाडी, सपकाळ नगर, भातखेडा, कोळपा, सोनवती, चिखलठाणा व लातूर शहरातील नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. वर्षभरात तीन मोफत अस्थीरोग निदान व औषधोपचार शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील डॉ. अशोक पोतदार यांनी दिलेल्या संकल्पनेतून ‘आम्ही तुमच्या दारी’ या योजनेत शेकडो रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी नितिन मोहनाळे, बाळासाहेब खोसे, राज धनगर, आदी ग्रामीण भागातील सर्व शाखाध्यक्ष व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.