दगडफेक, चर्चा एकत्र होऊ शकत नाही - अमित शहा
नवी दिल्ली, दि. 29 - काश्मीर खोर्यातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दगडफेक आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले.
पाकिस्तानशी आम्हाला चांगले आणि शांततेचे संबंध हवे आहेत. मात्र, वारंवार केले जाणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन, देशाचे जवान आणि नागरिकांच्या सुरक्षेची तडजोड करून संबंध सुधारू शकत नाहीत. भाजपप्रणित केंद्र सरकार स्थापन होतानाही शेजारच्या देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले होते. यावरून शेजारील देशांबरोबर आम्हाला चांगले संबंध ठेवायचे होते, हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. आम्ही चांगले संबंध ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी समोरून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, असे त्यांनी सांगितले. दगडफेक करणार्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. दगडफेकही बंद व्हायला हवी, असे त्यांनी नमूद केले.