Breaking News

काश्मीरला वाचवायचे असेल तर राज्यपाल राजवट लागू करा - फारूक अब्दुल्ला

श्रीनगर, दि. 29 - जम्मू-काश्मीरला दहशतवाद्यांपासून वाचवायचे असेल तर राज्यपाल राजवट लागू करा, असे आवाहन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक  अब्दुल्ला यांनी केले आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, राज्यपाल राजवट लागू करणे हाच शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा एकमेव उपाय आहे. आम्ही नेहमीच राज्यपाल राजवट लागू करण्याच्या विरोधात  आहोत. मात्र राज्यपाल राजवट लागू करण्याशिवाय काहीच पर्याय नाही. मी पंतप्रधान मोदी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. मात्र आमच्यात काय चर्चा झाली हे मी  तुम्हाला सांगू शकत नाही. मात्र पंतप्रधान मोदी यांनाही राज्यात शांतता नांदावी असे वाटत आहे. या सर्वाचा लवकरात लवकर शांततापूर्ण शेवट व्हावा अशी त्यांची  इच्छा आहे, असे त्यांनी नमूद केले.