Breaking News

सहयोगी कंपन्यांमधून होणारा कोट्यवधींचा गैरव्यवहार उघड

नवी दिल्ली, दि. 09 - गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या तपासातून सहयोगी कंपन्यांमधून होणार्‍या कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केंद्रीय अन्वेषण विभागाने उघड केला आहे. यामध्ये बेकायदा पद्धतीने व्यवहार करून 339 सहयोगी कंपन्यांनी सुमारे 2 हजार 900 कोटींचा गैरव्यवहार केल्याचे या तपासाअंती समोर आले आहे.
या सहयोगी कंपन्यांनी बँकेची कर्जे थकवण्यासाठी उलटसुलट व्यवहार केले. तर अनेक परकीय देशांमध्येही हा पैसा पाठवण्यात आला आणि हाच पैसा परकीय गुंतवणूक म्हणून दाखवला जात होता. या तपासातून मिळालेली माहिती नगण्य असल्याचे विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बँकेची फसवणूक करणे, कर्ज रकमेत अनियमितता आणणे, अशा काही गोष्टींसंदर्भात विभाग तपास करत आहे. विभागाने भ्रष्टाचार आणि अन्य मुद्यांवर तपास केल्यानंतर अशा सहयोगी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहे.