Breaking News

नीट परिक्षा प्रक्रियांमध्ये गैरप्रकार करण्याच्या तयारीत असणा-यांना अटक

पाटणा, दि. 09 - पाटणा जिल्ह्यात रविवारी झालेल्या नीट परिक्षेसह अन्य स्पर्धा परिक्षा प्रक्रियांमध्ये गैरप्रकार करण्याच्या तयारीत दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन वैद्यकिय विद्यार्थी व विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यासह राज्यात सक्रिय असलेल्या एका टोळीतील पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
पाटणाचे पोलीस अधीक्षक मनु महाराज यांनी सांगितले की, पाटणामध्ये स्पर्धा परिक्षांच्या प्रक्रियेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नीट परिक्षेच्या प्रक्रियेत फेरफार करण्याच्या तयारीत असणा-या दोन वैद्यकिय विद्यार्थ्यांसह विधी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्यासह एका खासगी शाळेतील कर्मचारी, एक वाहन चालक व एका टोळीतील पाच जणांना रविवारी ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेल्यांकडून मोबाईल फोन, पिकअप वाहन व काही अन्य उपकरणे जप्त करण्यात आले आहे.