Breaking News

आयएनएस ‘आदित्य’,आयएनएस ‘मुंबई’ इजिप्तमध्ये दाखल

नवी दिल्ली, दि. 09 - भारतीय नौदलाच्या आयएनएस ‘आदित्ययएनएस ‘मुंबई’ या युद्धनौका इजिप्तच्या अलेक्झांडर या शहरामध्ये पोहोचल्या आहेत. दोन्ही भारतीय युद्धनौकांच्या अधिका-यांनी इजिप्तच्या नौदलासह सामाजिक तसेच व्यावसायिक चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय नौदलाच्या मुंबईत असलेल्या पश्‍चिमेकडील नौदलाच्या नेतृत्वामधील एक तुकडी आयएनएस मुंबई आणि आयएनएस आदित्य पाच मे रोजीच इजिप्तमध्ये दाखल झाले आहेत.
व्यावसायिक संपर्काव्यतिरिक्त या युद्धनौका इजिप्तच्या नैदलासह क्रीडा तसेच सामाजिक संबंध प्रस्थापित करणार असल्याची माहिती कैरोमधील भारतीय दुतावासाकडून देण्यात आली आहे. भारत आणि इजिप्त या देशांची संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असून दोन्ही देशांमध्ये जवळचे संबंध आहेत. हेच मैत्रिपूर्ण संबंध असेच पुढे कायम राहण्यासाठी दोन्ही देशांनी अनेक क्षेत्रांमध्ये भागीदारी केली आहे. तसेच या दौ-यादरम्यान दोन्ही देशांमधील संबंध आणि सामंजस्य वाढविण्यास मदत होईल असेही सांगण्यात ले आहे.