केजरीवाल सरकारला अडचणीत आणण्याचा कट - संजय सिंग
नवी दिल्ली, दि. 09 - दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेले आरोप म्हणजे केजरीवाल सरकारला अडचणीत आणण्याचा कट असल्याचा दावा आम आदमी पक्षाचे संजय सिंग यांनी केला.
केजरीवाल यांनी आर्थिक व्यवहार करताना मिश्रा यांना बोलावून घेतले होते का, असा सवाल करत मिश्रा भारतीय जनता पक्षाप्रमाणे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्रीपदावरून हटवल्यामुळे मिश्रा यांची मानसिक स्थिती चांगली नाही. टँकर घोटाळ्यात केजरीवालांच्या नावाच समावेश करून केजरीवाल यांना बदनाम केले जात आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभाग केंद्र सरकारच्या इशार्यावर कामे करत आहे. त्या विभागावर केंद्र सरकार दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सीमेवर जवान शहीद होत असताना केंद्र सरकार आम आदमी पक्षाचे अस्तित्व संपवण्यामागे लागले आहेत, असेही ते म्हणाले. जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत आम्ही नक्की पाच वर्षे पूर्ण करणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.