Breaking News

काबूलमध्ये भारतीय दूतावासाजवळ शक्तिशाली स्फोट

काबूल, दि. 31 - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भारतीय दूतावासांजवळ आज सकाळी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. स्फोटानंतर विदेश दूतावास परिसरात सुरक्षा आणखी कडेकोट केली आहे. या स्फोटामुळे भारतीय दूतावासाच्या इमारतीचं थोडं नुकसान झालं आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहे. सुदैवाने भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
सुत्रांच्या माहितीनुसार, ईराणी दूतावासाला लक्ष्य करुन हा स्फोट घडवून आणला. मात्र अजून कोणीही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. याच परिसरात अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींचं निवासस्थानही आहे. स्फोटामुळे 100 मीटर अंतरावर असलेल्या घरांचं नुकसान झालं आहे.