Breaking News

कोहली आणि कुंबळेची धुसफूस, सीनियर खेळाडूही नाराज

मुंबई, दि. 31 - चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला पोहोचलेल्या टीम इंडियामध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. काही वृत्तानुसार, कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याचं कळतं.
विराट कोहलीसह टीम इंडियाचे अनेक सीनियर खेळाडू प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर नाराज आहेत. अनिल कुंबळे ज्यापद्धतीने संघाला मार्गदर्शन करतो, त्यावर खेळाडू नाखुश आहेत. कुंबळे संघात वट निर्माण करत आहे. ह्या वागणुकीमुळेच खेळाडूंनी बीसीसीआयच्या अधिकार्‍यांना कुंबळेची तक्रार केली आहे. टीम इंडियाचे सीनियर खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये कुंबळेच्या अ‍ॅटिट्यूडला कंटाळले आहेत. खेळाडूंच्या मते, कुंबळे ड्रेसिंग रुममधील त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहे.
विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील धुसफूस मार्च महिन्यात धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यादरम्यान सुरु झाली. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या संघातील समावेशाबद्दल विराट कोहलीला अगदी शेवटच्या क्षणी सांगण्यात आलं होतं, असं काही वृत्तात म्हटलं आहे.